आयपीएल 2024 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जबरदस्त सामना झाला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 20 धावांनी जिंकला. तसेच प्लेऑफच्या रेसमध्ये असल्याचं दाखवून दिलं. दिल्ली कॅपिटल्सने 8 गडी गमवून 221 धावा केल्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं होतं.
मात्र राजस्थान रॉयल्स संघ 201 धावा करून शकला. या सामन्यात संजू सॅमसनची विकेट खऱ्या अर्थान टर्निंग पॉइंट ठरली. तो बाद झाल्यानंतर राजस्थानचा डाव पत्त्यासारखा कोसळला. त्याने 86 धावांची खेळी केली होती. मात्र मुकेश कुमारच्या षटकात फ्लॅट सिक्स मारताना सीमेवर त्याचा झेल शाई होपने पकडला.
पण त्याचा पाय सीमारेषेला टच झाला की नाही यावरून बरंच काही झालं. इतकंच काय तिसऱ्या पंचांनी बाद दिल्यानंतर संजू सॅमसनने पंचांशी वाद घातला. तसेच रिव्ह्यू घेण्यासाठी प्रयत्न केला.मात्र तिथपर्यंत सर्वकाही ठरलं होतं. अखेर कर्णधार संजू सॅमसनला हताश होत मैदानाबाहेर पडावं लागलं. यानंतस सोशल मीडियावर बराच वाद रंगला. संजू सॅमसनच्या बाजूने अनेकांनी पोस्ट लिहिल्या. दुसरीकडे, आचारसंहितेचं उल्लंघन केल्याने संजू सॅमसनला दंड ठोठावण्यात आला.
मात्र इतकं होऊनही प्रश्न अनुत्तरीतच होता. आता नव्या व्हिडीओने या सर्व प्रश्नांना पूर्ण विराम लागला. संजू सॅमसन बाद असल्याचं यातून स्पष्ट झालं आहे.